पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज ठाकरे यांनी घेतली शरद पवारांची भेट

राज ठाकरे आणि शरद पवार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे. सोमवारी सायंकाळी राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतल्याचे सूत्रांकडून समजते आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर झालेल्या पहिल्या भेटीत या दोन्ही नेत्यांनी सुमारे ४५ मिनिटे राजकीय विषयावर केली. 

विखेंचे कॅबिनेट मंत्रिपद जवळपास निश्चित, खाते कोणते यावरून वाटाघाटी सुरू

महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार आणि राज ठाकरे यांच्यातील भेट नवीन नाही. यापूर्वीही अनेकदा दोन्ही नेत्यांमध्ये भेटी झाल्या आहेत. पण आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. काल (मंगळवार) काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीच्या नेत्यांची महत्वपूर्ण बैठक मुंबईत पार पडली होती. यामध्ये लोकसभेतील पराभवासह आगामी विधानसभा निवडणुकीबाबही चर्चा करण्यात आली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी मनसेला महाआघाडीत घ्यायचे की नाही, याबाबत कोणतीही चर्चा झालेली नसल्याचे म्हटले होते.   

Maharashtra Budget 2019 : विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जूनपासून, राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मनसेचा एकही उमेदवार उभा न करताना राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरुद्ध प्रचार मोहीम राबवली होती. ‘लाव रे तो व्हीडिओ’हे त्यांचे वाक्य चांगलेच गाजले. मनसेच्या या भुमिकेचा राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला फायदा होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.