पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज ठाकरे आज ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार

राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ईडीकडून चौकशी होणार आहे. चौकशीसाठी राज ठाकरे सकाळी ११ वाजता ईडीसमोर हजर राहणार आहेत. कोहिनूर मिल व्यवहार प्रकरणी राज ठाकरे यांना ईडीने समन्स बजावून २२ ऑगस्टला चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आज ते ईडीसमोर हजर राहणार आहे. दरम्यान, राज ठाकरे यांना नोटीस पाठवल्यामुळे मनसे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबईमध्ये पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राज ठाकरे यांचे निवासस्थान 
असलेल्या दादरच्या कृष्णकुंज परिसर आणि दक्षिण मुंबईत पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम सीबीआयच्या ताब्यात

राज ठाकरे यांना ईडीने नोटीस पाठवल्यामुळे मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अशामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. मुंबई पोलिसांनी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नोटीस पाठवली आहे. कलम १४९ अंतर्गत ही नोटीस पाठवण्यात आली आहे. जर नियमांचे उल्लंघन केले तर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी या नोटीसमध्ये सांगितले आहे.

चिदंबरम यांच्या निवासस्थानाबाहेर मोदींविरोधात घोषणा

दरम्यान, राज ठाकरे यांना ईडीने पाठवलेल्या नोटीसीनंतर अस्वस्थ झालेल्या मनसे कार्यकर्त्यांने आत्मदहन करुन आपले जीवन संपवले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना भावनिक साद घातली आहे. आपला सहकारी प्रवीण चौगुले याच्या निधनाची बातमी मन व्यथित करणारी आहे. आपल्या या सहकाऱ्यासारखे टोकाचे पाऊल कोणीही उचलू नये, अशी माझी कळकळीची विनंती आहे, असा उल्लेख राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना उद्देशून केला आहे. तसंच आज सर्व मनसे कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आणि ईडी कार्यालयाबाहेर कोणी येऊ नये असे आवाहन केले आहे.

प्रवीण सारखं टोकाचं पाऊल उचलू नका, राज यांची कळकळीची विनंती