पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'कितीही चौकशा होऊ द्या, पण मी तोंड बंद ठेवणार नाही'

राज ठाकरे

कोहिनूर मिल आर्थिक व्यवहार प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडीकडून तब्बल साडेआठ ते नऊ तास चौकशी झाली. मात्र भविष्यात वेळ पडल्यास अधिकारी त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलवू शकतात. तुर्तास राज ठाकरेंना या प्रकरणातून दिलासा मिळाला आहे. ही चौकशी झाल्यानंतर राज ठाकरे कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी दाखल होताच मनसे कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. ईडीच्या चौकशीनंतर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की,  'कितीही चौकश्या होऊ द्या, पण मी तोंड बंद ठेवणार नाही' असा इशारा राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना दिल्या. तर योग्य वेळ आल्यानंतर मी तुमच्याशी बोलेल असे देखील राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले. 

ED कडून राज ठाकरे यांची तब्बल आठ तासांहून अधिक वेळ चौकशी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारी सकाळी साडे अकरा वाजता ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिले. ईडीकडून तब्बल साडेआठ तासांहून अधिक वेळ त्यांची चौकशी झाली. या चौकशीत राज ठाकरे यांनी सहकार्य केल्याचे समजते. कोहिनूर मिल व्यवहार प्रकरणी राज ठाकरे यांना ईडीने समन्स बजावून २२ ऑगस्टला चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले होते. याप्रकरणात ईडीने विचारलेल्या सर्व प्रश्नांची राज ठाकरेंनी उत्तरे दिली. मात्र राज ठाकरे यांची ही सुटका तुर्तास असून भविष्यामध्ये गरज पडल्यास ईडीचे अधिकारी पुन्हा त्यांना चौकशीसाठी बोलवू शकतात. 

CBI कोर्टाचा मोठा निर्णय, पी. चिदंबरम यांना २६ ऑगस्टपर्यंत कोठडी