पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईत महिन्याचा पाऊस चार तासांतः मुख्यमंत्री फडणवीस

देवेंद्र फडणवीस

मुंबईत सोमवारी पडलेला पाऊस हा अभूतपूर्व असा होता. मुंबईच्या क्षमतेपेक्षा तीन ते चार पट अधिक पाऊस पडला. महिनाभराचा पाऊस हा तीन ते चार तासांत पडला. पोलिस, महानगरपालिका प्रशासन २४ तास कार्यरत आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आपात्कालीन परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत राज्य सरकार आणि मुंबई महापालिका प्रशासनाकडून होत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. तसेच हवामान विभागाने पुढच्या तीन ते चार दिवसांत मुंबईत अतिवृष्टीचा इशारा दिला असून लोकांनी गरज भासली तरच बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.

मुंबईत ४४ वर्षांतील दुसरा क्रमांकाचा मोठा पाऊस

पावसामुळे मुंबई, कल्याण आणि पुण्यात घडलेली घटना दुर्देवी आहे. भिंत पडून जखमी झालेल्या रुग्णांची मी भेट घेतली आहे. हे रुग्ण घाबरले असून त्यांना मी दिलासा दिला आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपये देण्याची राज्य सरकारने घोषणा केली असून मुंबई पालिकेनेही ५ लाख रुपये देण्याचे आवाहन त्यांनी केले.

साचलेले पाणी काढण्याचे काम सातत्याने सुरु आहे. आणखी दोन पंप अजून सुरु झालेले नाहीत. ते सुरु झाल्यास परिस्थिती लवकर सामान्य होईल. महानगरपालिका प्रशासन आणि पोलिसही २४ तास कार्यरत आहेत. नालेसफाई झाली होती. पण दोन तासांत ४०० मिमी पाऊस पडल्यामुळे नाले दुथडी भरुन वाहू लागले. भिंत कोसळण्याची दुर्घटना दुर्देवी आहे. मालाडमधील नागरिकांचे पुनर्वसन करणार असल्याचेही ते म्हणाले. 

मालाडमध्ये भिंत कोसळली, मृतांचा आकडा १८ वर

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी मुंबईतील रेल्वे, रस्ते वाहतुकीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्याबरोबर पालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी, मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे यांच्यासह अधिकारी उपस्थितीत होते.