पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मध्य रेल्वेची वाहतूक अखेर सुरळित; रुळाला गेले होते तडे

मध्य रेल्वे

ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. सायन-माटुंगा स्थानका दरम्यान रेल्वे रुळला तडे गेले होते. त्यामुळे मध्य रेल्वेची मुंबईच्या दिशेने येणारी धिम्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे कामाला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून वाहतूक सुरळीत झाली आहे 

मोदींच्या राज्यात तरुणाईवर तुरुंगवास भोगण्याची वेळ : प्रकाश

मध्य रेल्वे मार्गावर अचानक रेल्वेसेवा विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांची एकच तारंबळ उडाली. सायन-माटुंगा स्थानका दरम्यान पावणे सहाच्या दरम्यान धिम्या मार्गावर रेल्वे रुळाला तडे गेले होते. त्यामुळे मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती कळताच रेल्वे प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. रेल्वे रुळ दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर करत त्यांनी वाहतूक सुरळीत केली. 

DSP देविंदर सिंहच्या प्रकरणावरुन राहुल गांधींचा मोदी-शहांवर

मुंबईच्या दिशेने येणारी धिम्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे ती जलद मार्गावर वळवण्यात आली होती. वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे सर्वच स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. कामावर जाणाऱ्या प्रवाशांना कार्यालयात पोहचायला उशिर झाल्यामुळे लेटमार्क लागल. 

...तर जीभ जागेवर राहणार नाही; नारायण राणेंचा इशारा