पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, पार्सिक बोगद्याजवळ रुळाला तडे

मुंबई लोकल

कल्याणहून ठाण्याकडे येताना जलद मार्गावर लागणाऱ्या पार्सिक बोगद्याजवळ रेल्वेरुळाला तडे गेल्याचे शनिवारी सकाळी लक्षात आल्यानंतर या मार्गावरील जलद गाड्यांची वाहतूक तूर्त थांबविण्यात आली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. विशेष म्हणजे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी सकाळच्या वेळी जास्त असते. त्यावेळीच वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.

सर्वात कमी मताधिक्याने निवडून आलेले पाच उमेदवार कोण माहितीये?

पार्सिक बोगद्यातून एक्स्प्रेस गाड्यांसोबतच लोकलच्या जलद मार्गावरील गाड्या जात असतात. त्या सर्व तूर्त धीम्या गतीच्या मार्गावरून वळविण्यात आल्या आहेत. त्यातच मुंबईच्या दिशेने येणाऱ्या रेल्वे ट्रॅकवर लोकलची लांबच लांब रांग असल्याचे दिसते आहे. धीम्या मार्गावरील वाहतुकीवरही यामुळे परिणाम झाला आहे. 

हरियाणातील फॉर्म्युल्यानंतर शिवसेनेची 'बार्गेनिंग पॉवर' आणखी वाढली

जलद मार्गावरील रेल्वेरुळाचे काम करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू होईल, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.