पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांचा लोकलने प्रवास

केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे दिग्गज नेते आणि मंत्री प्रचारामध्ये व्यग्र आहेत. गुरुवारी मीरा भाईंदर मतदार संघातील भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या प्रचारासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोलय यांनी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे प्रचारानंतर त्यांनी चक्क लोकलने प्रवास केल्याचे पाहायला मिळाले.   

पियुष गोयल यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रवासासंर्भातील माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहंलय की, वाहतूक कोंडीच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी आणि वेळेची बचत करण्यासाठी मुंबई लोकल ट्रेन एक सर्वोत्तम साधन आहे. लोकलमुळे वेळेत घरी पोहचू शकलो. 

आम्ही ज्यांना नाकारले तेवढेच पवारांसोबत : CM फडणवीस

करवा चौथ असल्याने मुंबईतील रस्त्यारस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये यासाठी पियुष गोयल यांनी चक्क लोकलने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. भाईंदर स्थानकापासून ते ग्रँटरोडपर्यंत त्यांनी लोकलने प्रवास केला. केंद्रीय रल्वे मत्र्यांनी लोकलने प्रवास केल्याची सध्या चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे. 

मुंबई मेट्रो मराठी माणसासाठी धोक्याची : राज ठाकरे