पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईत लोकलचा प्रवास महागणार, पण...

मुंबईतील लोकल

मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकलच्या तिकिटांमध्ये वाढ होणार आहे. पण ही वाढ आता नाही तर २०२१ पासून लागू होणार आहे. २०२१ पासून चर्चगेट ते दादर या प्रवासासाठी प्रवाशांना सध्याच्या दहा रुपयांऐवजी अंदाजे १२.५ रुपये मोजावे लागणार आहेत. त्याचबरोबर चर्चगेट ते विरार या प्रवासासाठी सध्याच्या २० रुपयांऐवजी अंदाजे २५ रुपये मोजावे लागतील. मुंबई नागरी वाहतूक अधिभारात वाढ करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. त्यामुळेच २०२१ पासून तिकिटांमध्ये वाढ होईल.

सिनेमाच्या शूटिंगवेळी कर्मचाऱ्यांना पोलिस संरक्षण - मुख्यमंत्री

सध्या मुंबई नागरी वाहतूक अधिभार १८ टक्के इतका आहे. तो २०२१ पासून वाढून २५ टक्के करण्यात येणार आहे. त्यामुळेच तिकीट दरांमध्ये वाढ होईल. केंद्रीय मंत्रिमंडळाने या वाढीला ७ मार्च रोजी झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे. 

लोकलच्या पहिल्या आणि दुसऱ्या श्रेणीतील प्रवासासाठी २५ टक्के अधिभार आकारण्यात येईल. त्याचवेळी वातानुकूलित लोकलसाठी हीच टक्केवारी १२ इतकी असेल. रेल्वेकडून येत्या दोन वर्षांत भाड्यामध्ये वाढ करण्यात आली तर ती या अधिभारापेक्षा वेगळी असेल, असेही रेल्वेने स्पष्ट केले. साधारणपणे केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वे प्रवासाच्या भाड्यात वाढ केली जाते.

VIDEO : लडाखमध्ये उणे २० तापमानात जवानांकडून योगासने

एमयुटीपी ३ ए प्रकल्पासाठी रेल्वेने घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी रेल्वेकडून प्रवाशांवर अधिभार लावला जातो. प्रत्येकी दोन टप्प्यांत या प्रकल्पासाठी रेल्वेने ३५०० कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे.

मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटींवर सांगितले की, सध्या लोकल प्रवासाचे भाडे खूप कमी आहे. त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेचे नुकसान होते आहे. एमयुटीपी ३ प्रकल्पाचे काम प्रत्यक्ष सुरू झाल्यावर २५ टक्के अधिभार आकारण्यात येईल. २०२१ पासून त्याची अंमलबजावणी सुरू होईल.