पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रेल्वे रुळाला तडे, पश्चिम मार्गावरील वाहतूक विस्कळित

मुंबई लोकल

माटुंगा-माहीमदरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. चर्चगेटहून अंधेरीला येणारी धीमी वाहतूक उशिराने सुरु आहे. धीम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावरुन वळवली आहे. त्यामुळे धीम्या मार्गावरील वाहतूक २० मिनिटे उशिराने धावत आहे. ही घटना सकाळी साडेसात वाजता घडली. ऐन गर्दीच्या वेळी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे सर्वच स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. 

जलवाहिनी जोडणीच्या कामामुळे वांद्रे, धारावीत शनिवारी पाणीपुरवठा बंद

सकाळी ९ वाजेपर्यंत रुळांची दुरुस्ती झाली नव्हती. दरम्यान, शुक्रवारी रेल्वे रुळाला तडे गेल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. शुक्रवारी सायन-माटुंगा स्थानका दरम्यान रेल्वे रुळला तडे गेले होते.

मुंबईत जानेवारीत सर्वाधिक थंडी, दशकातील नवा विक्रम