पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

डोंबिवलीजवळ रुळाला तडा, सीएसएमटीकडे येणारी वाहतूक खोळंबली

मुंबई लोकल  (संग्रहित छायाचित्र)

कोपर स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याने डोंबिवलीहून सीएसएमटीकडे येणारी वाहतूक खोळंबली. कोपर स्थानकाजवळ रेल्वे गाड्या थांबल्याने या मार्गावरील वाहतूक २५ ते ३० मिनिटे उशिराने धावत आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आणि ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्याने प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली. 

पुण्यात रेल्वे पोलिसांसाठी बॉडी कॅमेरे, सगळंच रेकॉर्ड होणार

सोमवारी (आज) सकाळी आठच्या सुमारास कोपरजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याने मुंबईकडे येणाऱ्या सर्व लोकल्स डोंबिवलीतच थांबवण्यात आल्या होत्या. दरम्यान, रेल्वे रुळाला तडा गेल्याचे समजल्यानंतर रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. दरम्यान, अप धीम्यामार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू झाल्याचे रेल्वेने म्हटले आहे.


जगातील सर्वांत वेगवान बुलेट ट्रेनची चाचणी जपानमध्ये सुरू, वेग किती माहितीये?