पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ठाण्याजवळ रुळाला तडे, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वे (संग्रहित छायाचित्र)

ठाणे- मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यान रुळाला तडे गेल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वेची जलद वाहतूक धीम्या मार्गावरुन सुरु असल्यामुळे लोकल खोळंबल्या आहेत. नेमके ऑफिसवरुन घरी परत जाण्याच्या वेळीच लोकल वाहतूक खोळंबल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले आहेत. सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची तोबा गर्दी झाली आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाकडे जाणाऱ्या जलद मार्गावर बिघाड झाला आहे. रेल्वे स्थानकांवरुन याची घोषणाही करण्यात येत आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:rail fracture has happened on the up fast line between Diva and Thane stations central railway affected