पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सुप्रिया सुळेंशी गैरवर्तणूक करणाऱ्या टॅक्सी चालकाला अटक

सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी मुंबईतल्या दादर स्थानकात गैरवर्तन करणाऱ्या टॅक्सी चालकाला अटक  करण्यात आली आहे. कुलजीतसिंह मलहोत्रा असं या टॅक्सी चालकाचं नाव आहे. 

पीएनबी घोटाळा: नीरव मोदीच्या भावाविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी

सुप्रिया सुळे १२ सप्टेंबर रोजी देवगिरी  एक्सप्रेसनं प्रवास करत होत्या. यावेळी कुलजीतसिंह मल्होत्रा नावाच्या टॅक्सी चालकानं दादर टर्मिनसमध्ये लागलेल्या गाडीत प्रवेश केला. प्रवाशांनी आपल्या टॅक्सीनं प्रवास करावा यासाठी हुज्जत घालत होता. दोनदा नकार दिला असतानाही त्यांनी सुप्रिया सुळे यांचा रस्ता अडवला आणि गैरवर्तुणक केली. सुप्रिया सुळे यांनी ट्विटवर घडलेला सारा प्रकार पोस्ट करत त्यात रेल्वे मंत्रालयालाही टॅग केलं. या प्रकरणाची दखल रेल्वे मंत्रालयानंही घेतली. 

सलग ४ दिवस बँक राहणार बंद; महत्वाची कामं आताच करा

टॅक्सी चालकांना टॅक्सी स्टँड दिलं असतानाही ते प्लॅटफॉर्मच्या आत येतात त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली होती. सुप्रिया यांच्या ट्विटची दखल घेत आरपीएफनं या टॅक्सीचालकाला अटक केली आहे. तसेच नियम पायदळी तुडवल्याबद्दल दंडही आकारण्यात आला आहे, अशी माहिती सुप्रिया यांनी ट्विट करून दिली आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:rail authorities apprehended and fined taxi driver who harassed Supriya Sule at dadar railway station