पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुणेकरांना सर्वोतोपरी मदत करू - मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुण्यात बुधवारी रात्री झालेल्या अतिप्रचंड पावसामुळे सहा पेक्षा अधिक जणांचा बळी गेला. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून, दुचाकी व चारचाकी गाड्या वाहून गेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेमुळे आपल्याला अतीव दुःख झाल्याचे म्हटले आहे. पावसाच्या पाण्यामुळे जे मृत पावले आहेत, त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. त्याचबरोबर पूरग्रस्त भागातील लोकांना राज्य सरकार आणि पुण्याचे जिल्हा प्रशासन, महापालिका सर्वोतोपरी मदत करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

पुण्यात अतिप्रचंड पावसामुळे हाहाकार

आपल्या ट्विटमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, राज्याचा आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि नियंत्रण कक्ष सातत्याने पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका यांच्या संपर्कात आहे. पुण्यामध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या (एनडीआरएफ) दोन टीम आणि बारामतीमध्येही दोन टीम दाखल झाल्या आहेत. बारामतीमध्ये अजून एक टीम दाखल होते आहे. या भागातील धरणांच्या विसर्गावरही राज्य सरकार लक्ष ठेवून आहे, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

पुण्याला पावसाने झोडपले; शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

पुणे शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात बुधवार रात्री आठनंतर ढगफुटीसारखा पाऊस पडला. रात्री उशीरापर्यंत पावसाचा जोर कायम होता. या पावसामुळे पुणे शहराच्या दक्षिण भागात असलेल्या ओढे, नाल्यांना पूर आला होता. हेच पुराचे पाणी विविध सोसायट्या आणि इतर भागात शिरल्यामुळे हाहाकार उडाला. सुरक्षा भिंती कोसळल्या, दुचाकी, चारचाकी गाड्या वाहून गेल्या. या सर्व ठिकाणी आता मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.