पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे, पिंपरी-चिंचवडमधील शाळा बंद

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील शाळा, महाविद्यालये पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. जनतेच्या हितासाठी खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले. याबाबत घेतलेले निर्णय आज मध्यरात्रीपासून लागू होणार असल्याचेही त्यांनी म्हटले. दहावी आणि बारावीची परीक्षा वगळता शालेय परीक्षा उशिरा घेण्याबाबतही विचार सुरु असल्याचे ते म्हणाले. 

नागपूरमध्ये २ तर पुण्यात आणखी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत निवेदन दिले. यावेळी त्यांनी राज्यातील स्थिती सभागृहाला सांगितली. तसेच राज्य सरकार करत असलेल्या उपाययोजनांची माहितीही दिली. 

मुंबई, पुण्यातील जीम, स्विमिंग पूल, थिएटर बंद करण्याचा निर्णय

ते पुढे म्हणाले की, परिस्थिती गंभीर होऊ नये यासाठी राज्यातील स्थितीचा आढावा घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, मुंबई येथील जिम, जलतरण तलाव, चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे बंद राहणार आहेत. नागरिकांनी गर्दी करणे टाळावे, कोणताही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केला जाऊ नये, क्रीडा स्पर्धा घेतल्या जाऊ नयेत. त्याचबरोबर शक्य असेल तर कर्मचाऱ्यांनी वर्क फ्रॉम होम करावे. रेल्वे आणि बससेवा अत्यावश्यक असल्याने त्या सुरुच राहतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:pune pimpri chinchwad school remain close due to coronavirus covid 19 announce by cm uddhav thackeray