पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यातील CCTV मुळे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या किती जणांना दंड झाला माहितीये?

पुण्यातील सीसीटीव्ही कॅमेरे

सार्वजनिक ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेसाठी राज्य सरकारने मुंबई, पुणे व नागपूर शहरांमध्ये सुमारे नऊ हजार ८०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. सीसीटीव्हीमुळे गुन्ह्यांचा शोध घेण्यास मोठी मदत होत असून, आतापर्यंत सुमारे ११०० हून अधिक गुन्ह्यांची उकल करण्यास त्यांची मदत झाली आहे.

अजित पवारांसह ५० नेत्यांचा पाय खोलात,सुप्रीम कोर्टाने फेटाळली याचिका

सध्या मुंबई शहरामध्ये १५१० ठिकाणी ५००० सीसीटीव्ही कॅमेरे, पुणे शहरात ४२५ ठिकाणी एकूण १२३४ कॅमेरे बसविण्यात आले आहेत. पुणे शहरातील सीसीटीव्हीमुळे वाहतुकीचे नियम तोडल्याप्रकरणी सुमारे १४ लाख ई चलान फाडण्यात आले आहेत. अनेक गुन्ह्यांची उकल करण्यासाठी फुटेजचा उपयोग झाला असून, शहरातील एकूण २१६ गुन्हे उघडकीस आले.

मुंबईतील सीसीटीव्हीमुळे वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या सात लाख जणांविरुद्ध ई चलान काढण्यात आले. गुन्ह्यांच्या शोधासाठी २१०० फुटेजची मदत झाली. मुंबई शहरात आणखी ५६२५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मुंबई व पुणे शहर मिळून एकूण ९७२ आरोपींना अटक करण्यात आली. नागपूर शहरामध्ये ३६०० सीसीटीव्ही कार्यान्वित करण्यात आले आहेत. 

सचिनच्या पराक्रमाची पुनरावृत्ती, हनुमा दिग्गजांच्या यादीत

सीसीटीव्हीमुळे धार्मिक व सार्वजनिक उत्सव, मोर्चे, आंदोलने, अति महत्त्वाच्या व्यक्तींचे दौरे, निवडणुका इत्यादी घटनांचे प्रभावी नियंत्रण करणे शक्य झाले आहे. गेल्या पाच वर्षांत राज्य शासनाने कायदा व सुव्यवस्था योग्य प्रकारे राखली जावी, यासाठी विविध प्रकल्प राबविले आहेत. त्यामध्ये गुन्हा व गुन्हेगारी माग काढण्यासाठी नेटवर्क व यंत्रणा प्रकल्प तसेच सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे आदी महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे.