पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना विषाणूः नागरिकांना हँडवॉश द्या, चंद्रकांत पाटील यांची मागणी

चंद्रकांत पाटील

पुण्यामध्ये कोरोना विषाणूचे ५ रुग्ण आढळून आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी राज्य सरकारही सावध झाले असून खबरदारीचा उपाय म्हणून पुण्यातील काही शाळा बंद ठेवण्यात आले आहेत. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील नागरिकांना सरकारने हँडवॉश पुरवण्याची मागणी विधानसभेत केली आहे. 

मी संघाच्या शाखेत जायचो, मिलिंद सोमणचा गौप्यस्फोट

मास्कची किंमत आणि हँडवॉशच्या किंमती जास्त आहेत. हे सर्वसामान्य माणसांना परवडणारे नाही. त्यामुळे सरकारने स्वस्त धान्य घेणाऱ्या सर्वांना किमान हँडवॉश द्यायला हवेत. सरकारने मास्कचा साठा बाजारातून उचलला पाहिजे, असेही ते म्हणाले. 

ब्रिटनच्या आरोग्यमंत्र्यांनाच कोरोना व्हायरसची लागण

प्रत्येकाला मास्क लावण्याची गरज नाही. परंतु, लोकांमध्ये याची दहशत पसरली आहे. मास्क बाजारात उपलब्धही होत नाहीत. सरकारने हँडवॉशचा पुरवठा करावा, असे त्यांनी सांगितले.