पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कुलाब्यात वेश्या व्यवसायाचा भंडाफोड, तीन तरुणींची सुटका

प्रातिनिधिक छायाचित्र

एस्कॉर्ट सर्व्हिसच्या नावाखाली कुलाब्यातील उच्चभ्रू भागामध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा मुंबईतील अमली पदार्थविरोधी पथकाने भंडाफोड केला. पथकाने या ठिकाणाहून दोन तरुणींची आणि एका अल्पवयीन मुलीची सुटका केली. या दोन्ही तरुणींना मॉडेल व्हायचे आहे. काहीच दिवसांपूर्वी या पथकाने मसाज सेंटरवर सुरू असलेला वेश्या व्यवसाय उघडकीस आणला होता.

'जामियातील पोलिस कारवाईत एका डोळ्याची दृष्टी गमावली'

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला दक्षिण मुंबईत वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्या आधारावर अमली पदार्थ विरोधी विभागाने कारवाई केली. यावेळी मुंबई पोलिसांच्या सामाजिक सेवा शाखेचे कर्मचारीही होते. या पथकातील अधिकाऱ्यांनी बनावट लोकांच्या नावाने एस्कॉर्ट सर्व्हिसला फोन केला. या लोकांना कुलाब्यातील हॉटेल ब्ल्यू लाईटमध्ये बोलावण्यात आले. तिथे आम्ही आधीपासून सापळा रचलेला होता. या हॉटेलच्या रुममध्ये धाड टाकल्यावर तेथून तरुणींना ताब्यात घेण्यात आले. 

Jharkhand Election Result:त्रिशंकू अवस्थेत हे नेते ठरतील 'किंगमेकर'

पोलिसांनी या हॉटेलचे मालक मोमिन अख्तर, तेथील वेटर वीरेंद्र ठाकूर आणि एक व्यावसायिक संजय जैन यांना अटक केली. या तिघांविरोधात भारतीय दंडविधान संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आता या रॅकेटचा मूळ सूत्रधार कोण आहे, याचा शोध पोलिस घेत आहेत.