पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अनुराधा पौडवाल यांच्या घरी चोरी, पुजाऱ्यांनी चोरले ७ लाखांचे दागिने

अनुराधा पौडवाल

खार पोलिसांनी अनुराधा पौडवाल यांच्या घरी कित्येक वर्षे काम करणाऱ्या पुजाऱ्यास चोरीच्या प्रकरणावरून अटक केली आहे.  पौडवाल यांच्या घरी काम करणाऱ्या ४६ वर्षीय  विमलेंद्रू मिश्रा यांना  ७ लाखांचे दागिने चोरल्याच्या आरोपावरून रविवार अटक करण्यात आली आहे. 

Happy Birthday : सर्वोत्तम नाटकांची निर्मिती करणारा धडाडीचा निर्माता

 विमलेंद्रू मिश्रा हे गेल्या कित्येक वर्षांपासून पौडवाल यांच्या घरी पुजारी म्हणून काम करत आहेत. पौडवाल शुक्रवारी रात्री ८ च्या सुमारास घरी आल्या तेव्हा, देव्हाऱ्यातील देवीचे दागिने गायब होते. देवासाठी असलेली सोन्याची चेन, बांगड्या,  सोन्याची पैंजण हे  गायब झाल्याचे पौडवाल यांच्या लक्षात आले. त्यांनी पुजारी आणि घरातील कर्मचाऱ्यांची चौकशी केली. मात्र  काहीच न समजल्यानंतर त्यांनी  स्वत:च्या पीएला फोन केला, त्यानंही चौकशी केली मात्र यातून काहीच निष्पन्न न झाल्यानं पौडवाल यांनी खार पोलिसांना माहिती दिली.

तुझ्यात जीव रंगला :सेटवर पूजा करून केला १००० भागांच्या यशाचा आनंद

या प्रकरणात एफआयरही दाखल करण्यात आली. पोलिसांना या प्रकरणात पुजाऱ्यावर संशय होता. पोलिसांनी मिश्रांच्या घराची झडती घेतली. अखेर मिश्रा यांनी आपला गुन्हा कबूल केला. हे दागिने चोरुन ते मित्राला दिल्याची माहिती मिश्रा यांनी दिली.