पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शपथविधी सोहळ्यासाठी 'शिवतिर्था'वर जोरदार तयारी

शिवाजीपार्क

नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार गुरुवारी सत्तेमध्ये येणार आहे. राज्याचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शपथविधी सोहळा गुरुवारी संध्याकाळी दादर येथील शिवतिर्थावर होणार आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी शिवाजीपार्कवर जोरदार तयारी सुरु आहे.

'एकच वादा..अजितदादा', मंत्रिमंडळ स्थापण्याआधी समर्थकांची घोषणाबाजी
 
मुख्य सचिवांकडून उद्धव ठाकरेंना शपथविधी सोहळ्याची माहिती देण्यात आली आहे. दादर येथील शिवाजीपार्कवर मंडप आणि स्टेज बांधण्याचे काम सुरु आहे. उद्या दुपारी १२ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उद्या संध्याकाळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. तसंच त्यांच्यासोबत इतर मंत्री देखील शपथ घेणार आहेत. 

काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेल्यामुळे शिवसेनेला मुंबईत पहिला धक्का

भव्य दिव्य स्वरुपाचा हा शपथविधी सोहळा होणार आहे. या शपथविधी सोहळ्याला कोणाला कोणाला निमंत्रण दिले आहे आणि कोण-कोण उपस्थित राहणार आहेत याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. दरम्यान, शपथविधी सोहळा आणि मंत्रिमंडळाबाबत चर्चा करण्यासाठी तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची चर्चा सुरु आहे. 

सिंचन घोटाळ्याचे बैलगाडीभर पुरावे रद्दीत विकले: खडसे

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:preparations underway at shivaji park ahead of the swearing in ceremony of uddhav thackeray as the cm