पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'देशात अराजकता माजवण्याचा कट RSS आणि भाजप सरकारनेच रचला'

प्रकाश आंबेडकर

नागरिकत्व सुधारणा कायदा हा मुस्लिमांच्या विरोधात आहेच. पण हा कायदा ४० टक्के हिंदूंच्या विरोधात असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. या देशामध्ये अराजकता माजवण्याचा कट आरएसएस आणि भाजप सरकारनेच रचला असल्याची टीका त्यांनी केली आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीविरोधात प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली दादर येथे आंदोलन सुरु आहे. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.  

तुकडे-तुकडे गँगला जनेतेने धडा शिकवावाः अमित शहा

काही लोकांचा मताधिकार काढून घेण्यासाठी मोदी सरकारला एनआरसी लागू करायची आहे, असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. देशातील काहींचा मताधिकार काढून घ्यायचा आहे त्यासाठी सरकारला त्यांचे नागरिकत्व रद्द करायचे आहे. त्यामुळेच मोदी सरकराने एनआरसीचा कट रचला असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.  

नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनावर

दरम्यान, जर तुम्ही कागदपत्र दिली नाहीत, तर तुम्हाला डिटेन्शन सेंटरमध्ये पाठवण्यात येईल. डिटेंशन सेंटरमध्ये कमीत कमी दोन लाख लोकं राहतील ऐवढी मोठी जागा आहे. जे सरकारविरोधी ओरडतील त्यांच्यासाठी हे सेंटर तयार केले आहेत”, असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला. डिटेंशन सेंटरमध्ये जायचं नसेल, तर मोदी सरकार पाडा, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी जनतेला केले आहे.  

भाजपच्या मित्रपक्षांना नागरिकत्व कायदा - एनआरसीवरून काय