पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'बजरंग दल, भाजपच्या विरोधानंतरही महाराष्ट्र बंद यशस्वी'

प्रकाश आंबेडकर

'बजरंग दल, भाजपच्या विरोधानंतरही महाराष्ट्र बंद पूर्णपणे यशस्वी झाला असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. वंचित बहुजन आघाडीने पुकारलेला महाराष्ट्र बंद ४ वाजता मागे घेण्यात आला असल्याची घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत केली. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी बंदमध्ये सहभागी झालेल्या जनतेचे आभार मानले आहे. दरम्यान, दगडफेक करणारे चेहरा झाकून आले होते. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कुठेही तोडफोड केली नसल्याचा दावा, त्यांनी केला आहे. 

 

फोन टॅप प्रकरण : इस्रायला जाऊन चौकशी केली तरी हरकत नाही

प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदे दरम्यान सांगितले की, वंचितने पुकारलेला महाराष्ट्र बंद मागे घेत आहोत. आता लोकांचे जनजीवन पुन्हा सुरळीत होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. बंद दरम्यान तीन ते सव्वा तीन हजार कार्यकर्तयांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कार्यकर्त्यांनी काही केले नसेल तर त्यांना सोडण्यात यावे तसंच त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याची विनंती पोलिस यंत्रणांना करणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. 

राज ठाकरेंना मशिदीवरील भोंग्यांचा आताच त्रास का?

दरम्यान, महाराष्ट्र बंद वेळी आम्ही कुठलीही जबरदस्ती केली नाही. जबरदस्ती केली असती तर टॅक्सी, रिक्षा, बस बंद केल्या असत्या. पण आम्हाला यावेळी जबरदस्ती करायचीच नव्हती, असे प्रकाश आंबेडकरांनी सांगितले. आरएसएसने प्रचार केला आहे की, एनआरसी आणि सीएए हिंदुंना लागू होणार नाही. त्यांच्या या प्रचाराला आम्हाला उत्तर द्यायचे होते. संघ आणि भाजपला दाखवण्यासाठी हा महाराष्ट्र बंद केला असल्याचे प्रकाश आंबेडकरांनी सांगितले. 

'...कारण मी कोणाच्या बापाला घाबरत नाही'