वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी 'मातोश्री' निवासस्थानावर जात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. आंबेडकर-ठाकरे यांची महिनाभरातील ही दुसरी वेळ आहे. आंबेडकर यांच्याकडून येत्या २४ जानेवारीस महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर आणि देशाच्या आर्थिक स्थितीवर चर्चा झाल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी भेटीनंतर माध्यमांना सांगितले. यावेळी आमदार कपिल पाटील हेही उपस्थित होते.
युती तोडल्याचा शिवसेनेला पश्चाताप होणार: देशमुख
प्रकाश आंबेडकर हे रविवारी दुपारच्या सुमारास मातोश्रीवर गेले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी २४ तारखेचा बंद शांततेत पार पाडण्याचे आवाहन आंबेडकर यांना केले. तसेच आंबेडकर यांनी देश आर्थिक दिवाळखोरीत असल्याचे वक्तव्य केले होते. त्याची माहिती ठाकरे यांनी जाणून घेतली.
मागील दादर येथे झालेल्या आंदोलनाप्रमाणे २४ तारखेचा बंदही शांततेत पार पडेल अशी ग्वाही प्रकाश आंबेडकर यांनी दिली. या बंदमध्ये बँक कर्मचारी संघटना, एसटी आणि तेल कंपन्यांच्या संघटनांनी सहभागी होणार असल्याचे म्हटले आहे. बेस्टशी आमचे अजून बोलणे झालेले नाही. त्यांच्याशीही आम्ही चर्चा करणार आहोत.
संजय राऊतांना पदावरुन दूर करा; संभाजी भिडेंची उद्धव ठाकरेंकडे मागणी
ज्याप्रमाणे एनआरसी, एनआरपी, सीएएबद्दल लोक बोलतात. त्याचप्रमाणे देशाच्या आर्थिक स्थितीबद्दलही बोलायला हवे. शासनाच्या धोरणामुळे लोक व्यवहार करत नसल्याचेही ते म्हणाले.