पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'२२ डिसेंबरनंतर उपमुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेतला जाईल'

प्रफुल पटेल

राज्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महा विकास आघाडीच्या सरकारला बहुमच चाचणी सिध्द करण्यात यश आले आहे. बहुमत चाचणी सिध्द झाल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो. मात्र त्यासाठी तीन आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी हे संकेत दिले आहेत.

फडणवीसांनी खडसेंकडे 'क्लास' लावावा: नवाब मलिक

प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले की, 'उपमुख्यमंत्री पद राष्ट्रवादी काँग्रेसकडेच असणार आहे. मात्र उपमुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय २२ डिसेंबरनंतर होईल.'  तसंच, नागपूर येथे होणारे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर म्हणजेच २२ डिसेंबरनंतर उपमुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. 

छत्रपतींच्या, आई-वडिलांच्या नावानं शपथ घेणं गुन्हा नाहीः उद्धव

उद्धव ठाकरेंचे सरकार बहुमत सिध्द करण्यात यशस्वी झाले आहे. ठाकरे सरकारला १६९ आमदारांनी मतदान केले. तर ४ आमदार तटस्थ राहिले. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना, एमआयएम आणि सीपीआयच्या आमदारांचा समावेश आहे. सरकारच्या विरोधात एकही मत पडले नाही. कारण भाजपने सभात्याग केला. 

महापुरुषांबद्दल भाजपला इतकी असूया का आहे; जयंत पाटलांचा सवाल

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:prafful patel says deputy cms post we will fill up the post after nagpur assembly session