पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कल्याण ते डोंबिवलीदरम्यान बुधवारी मेगा ब्लॉक, अनेक एक्स्प्रेस रद्द

मुंबई लोकल

ठाकुर्ली स्थानकावर पादचारी पुलाचे काम करण्यासाठी मध्य रेल्वेवर बुधवारी, २५ डिसेंबरला सकाळी पावणेदहा ते दुपारी पावणेदोन या कालावधीत मेगा ब्लॉक असणार आहे. या ब्लॉकमुळे लोकलसह अनेक मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून, काही गाड्या बुधवारसाठी रद्दही करण्यात आल्या आहेत. या काळात मध्य रेल्वेवर डोंबिवली ते कल्याण या मार्गावरील नियमित लोकल सेवा रद्द करण्यात आली आहे. 

उद्धव ठाकरेंविरोधात FB पोस्ट भोवली, शिवसैनिकांकडून तरुणाचे अर्धमुंडण

प्रवाशांच्या सोयीसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते डोंबिवली या मार्गावर दर १५ मिनिटाला लोकल धावेल. तर कल्याण ते कर्जत-कसारा मार्गावर दर २० मिनिटाला लोकल धावेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे या मार्गावरील लोकल सेवा बुधवारी सुरळीत असणार आहे. 

ठाकुर्ली स्थानकातील कामामुळे खालील एक्स्प्रेस गाड्या २५ डिसेंबरपुरता रद्द करण्यात आल्या आहेत.

11030 कोल्हापूर- सीएसएमटी सह्याद्री एक्स्प्रेस प्रस्थान दिनांक 24.12.2019
51154 भुसावल-सीएसएमटी पॅसेंजर प्रस्थान दिनांक 24.12.2019
11010 पुणे-सीएसएमटी सिंहगड एक्स्प्रेस
22102 मनमाड-सीएसएमटी राज्यरानी एक्स्प्रेस
12124 पुणे-सीएसएमटी डेक्कन क्वीन एक्स्प्रेस
12110 मनमाड-सीएसएमटी पंचवटी एक्स्प्रेस
12118 मनमाड-एलटीटी गोदावरी एक्स्प्रेस
12072 जालना- दादर जनशताब्दी एक्स्प्रेस
12117 एलटीटी-मनमाड गोदावरी एक्स्प्रेस
11009 सीएसएमटी- पुणे सिंहगड एक्स्प्रेस
12123 सीएसएमटी पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेस
12109 सीएसएमटी मनमाड़ पंचवटी एक्स्प्रेस
22101 सीएसएमटी - मनमाड राज्य रानी एक्स्प्रेस
12071 दादर- जालना जनशताब्दी एक्स्प्रेस
51153 सीएसएमटी- भुसावळ पॅसेंजर गाड़ी
11029 सीएसएमटी- कोल्हापूर सह्याद्री एक्स्प्रेस

३० डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता, अजित पवारांचेही कमबॅक?

खालील गाड्या मुंबईकडे जाताना कर्जत-पनवेल-दिवा मार्गे जातील.
12220 सिकंदराबाद-एलटीटी एक्स्प्रेस
11024 कोल्हापूर- सीएसएमटी सह्याद्री एक्स्प्रेस
17032 हैदराबाद- सीएसएमटी एक्स्प्रेस
11042 चेन्नई- सीएसएमटी एक्स्प्रेस