पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बांगलादेशींनो चालते व्हा नाहीतर...; मनसेचा पोस्टरबाजीतून इशारा

मनसे पोस्टरबाजी

बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना मुंबईतून हाकलवून लावण्याचा पवित्रा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाने घेतला आहे. यासाठी येत्या ९ फेब्रुवारी रोजी मनसे मुंबईत मोर्चा देखील काढणार आहे. त्यापूर्वी बांगलादेशी घुसखोरांविरोधात मनसेची पोस्टरबाजी पहायला मिळाली आहे. पनवेलमध्ये पोस्टरबाजीच्या माध्यमातून मनसेने बांगलादेशी घुसखोरांना इशारा दिला आहे. या पोस्टरवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि नुकताच राजकारणात एन्ट्री केलेले त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला आहे.

चीनमध्ये कोरोनाने घेतला आणखी ६४ जणांचा बळी; मृतांचा आकडा ४२५

पनवेलमध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोर आहेत. त्यांना हाकलवून लावण्यासाठी पनवेलमधील मनसेचे नेते महेश जाधव आणि सुधीर नवले यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी पनवेल येथे पोस्टर लावून बांगलादेशींनी मनसे स्टाईलने इशारा दिला आहे. 'पनवेलमधील बांगलादेशींना निर्वाणीचा 'मनसे' इशारा...चालते व्हा...नाहीतर मनसे स्टाइल धडा शिकवला जाईल.', असे या पोस्टरवर लिहिण्यात आले आहे.  

'कोरोना' राज्यावर ओढवलेली आपत्ती : केरळ सरकार

बेकायदा बांगलादेशींना भारतातून हाकला हीच आमची भूमिका असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले आहे. घुसखोर पाकिस्तानी आणि बांगलादेशींना समर्थन देणाऱ्या मोर्चांच्या विरोधात मनसे ९ फेब्रुवारीला मुंबईमध्ये मोर्चा काढणार आहे. भायखळा येथील जिजामाता उद्यान येथून ते आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. परवानगीसाठी मनसेकडून पोलिसांना पत्र पाठवण्यात आले आहे.

एल्गार परिषदप्रकरणात NIA कडून नव्याने FIR दाखल