पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईत आठवड्या अखेरीस मान्सूनोत्तर सरी

आठवड्या अखेरीस पावसाच्या सरी

मुंबई, ठाणे, पालघरमध्ये शुक्रवारपासून आठवड्या अखेरपर्यंत मान्सूनोत्तर सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.  शुक्रवारी मुंबई आणि उपनगरीय भागात विजांच्या गडगडात पाऊस पडेल शुक्रवार पासून रविवारपर्यंत पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. तर मुंबईसह राज्याच्या अनेक भागांत सोमवारी म्हणजेच मतदानाच्या दिवशीदेखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

आरबीआयने २००० रुपयांच्या नोटेची छपाई केली बंद

मुंबई आणि महाराष्ट्राच्या काही भागात १८ ते २२ ऑक्टोबर या काळात पावसाची शक्यता स्कायमेटनं वर्तवली आहे.  मुंबई बरोबरच विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात दुपारनंतर ढगाळ हवामानासह वादळी पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. 

मला सांगा मी काश्मिरला नेतो, '३७०' वरून मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

यावेळी मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर; कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी; तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातील काही भागांत ढगाळ वातावरणासह वादळी पाऊस पडणार आहे याचबरोबर नाशिक, धुळे, जळगाव आणि नगर जिल्ह्यातील काही भागात १९ ते २० दरम्यान मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज आहे.