पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

किमान भाडे कमी केल्यावर आता 'बेस्ट'पुढे नवा प्रश्न...

बेस्टमध्ये चढण्यासाठी लागलेली प्रवाशांची रांग

बेस्ट प्रशासनाने तिकिटाच्या किमान दरामध्ये कपात केल्यानंतर प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. बेस्टच्या प्रवासी संख्येत १७ वरून २५ लाखांपर्यंत वाढ झाली आहे. पण तिकिटाचा किमान दर ८ रुपयांवरून पाच रुपये केल्यामुळे एक नवाच प्रश्न प्रशासनापुढे उभा राहिला आहे. किमान भाडे पाच रुपये केल्यामुळे बेस्टकडे दररोज सुमारे १० लाख रुपयांची नाणी जमा होऊ लागली आहेत. 

उदित नारायण यांना जीवे मारण्याची धमकी, घराबाहेरील गस्त वाढविली

बेस्ट प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी प्रत्येक वाहक त्याचे काम संपल्यावर डेपोमध्ये १०० ते १५० रुपयांची नाणी जमा करीत होता. पण किमान भाडे पाच रुपये झाल्यानंतर प्रत्येक वाहक आता डेपोमध्ये ३०० ते ४०० रुपयांची नाणी जमा करीत आहे. यामुळे बेस्टच्या सर्वच २६ डेपोंमध्ये नाण्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

बेस्टचे मुख्य प्रवक्ते हनुमंत गोफणे म्हणाले, आधी आमच्या सर्व डेपोंमध्ये मिळून दिवसाला तीन ते चार लाख रुपयांची नाणी जमा होत होती. पण आता दिवसाला सर्व डेपोंमध्ये मिळून १३ ते १४ लाख रुपयांची नाणी जमा होत आहेत. 

घाटकोपर: वाढदिवसाच्या दिवशीच युवकाची हत्या

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, १० आणि पाच रुपयांची नाणी येण्याचे प्रमाण एक आणि दोन रुपयांच्या नाण्यापेक्षा वाढले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात येणारी नाणी मोजायची कशी, असा प्रश्न आता डेपोतील कर्मचाऱ्यांपुढे पडला आहे. डेपोतील रोकड विभागाकडे आधीच कमी कर्मचारी आहेत. या विभागातील कर्मचारी इतर ठिकाणी पाठविण्यात आले आहेत. त्यातच आता नाण्यातून येणारे उत्पन्न वाढल्यामुळे परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. कर्मचाऱ्यांचे काम मोठ्या प्रमाणात वाढले आहे, असे बेस्ट समिती आणि कामगार संघटनेचे सदस्य सुहास सामंत यांनी सांगितले.