पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वंशज असल्याचे पुरावे आणा, संजय राऊतांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकारण तापले

संजय राऊत यांनी शिवाजी महाराजांच्या वंशजांची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी भाजप नेत्यांनी केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे सादर करावेत, असे वक्तव्य बुधवारी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी नाव न घेता छत्रपती उदयनराजे भोसले यांना दिलेल्या प्रत्युत्तरात केले होते. पण आता या वक्तव्यावरून राजकारण पेटले आहे. उदयनराजे भोसले यांच्याकडे वंशज असल्याचे पुरावे मागणे हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या साताऱ्याच्या गादीचा अपमान आहे, अशी टीका भाजपने केली. या प्रकरणी संजय राऊत यांनी माफी मागितली पाहिजे, असेही भाजपने म्हटले आहे. 'लोकमत' वृत्तपत्राने पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळ्यात संजय राऊत यांची मुलाखत घेतली. यावेळी एका प्रश्नाला दिलेल्या उत्तरात संजय राऊत यांनी वंशजांकडे पुरावे मागितले.

'जाणता राजा'च्या उपाधीवरुन शरद पवारांनी साताऱ्यात केलं हे भाष्य

'आज के शिवाजी - नरेंद्र मोदी' या पुस्तकावरून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणी शिवाजी महाराजांच्या वंशजांनी राजीनामे दिले पाहिजेत, अशी मागणी संजय राऊत यांनी केली होती. त्याला उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी उत्तर दिले होते. शिवसेना नाव काय वंशजांना विचारून दिले होते का, असा प्रश्न त्यांनी विचारला होता. याच विषयावरून बुधवारी पुन्हा एकदा संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना डिवचले. वंशज असल्याचे पुरावे घेऊन या, असे वक्तव्य त्यांनी केले. 

या विषयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपचे नेते आशिष शेलार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांकडे पुरावे मागणारे जेम्स लेनची अवलाद आहेत. हा साताऱ्याच्या गादीचा अपमान आहे. 

राहुल गांधींनी रोज १५ तास पक्ष कार्यालयात काम करावे, संजय राऊतांचा सल्ला

संजय राऊत यांनी शिवाजी महाराजांच्या वंशजांची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी भाजप नेत्यांनी केली आहे.