पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृह विभागाकडून गुरुवारी जारी करण्यात आला. यामध्ये नांदेडचे पोलीस अधीक्षक संजय बी. जाधव यांची राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबईच्या उपायुक्त पदी आणि उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक राजा रामसामी यांची राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई याठिकाणी उपआयुक्त पदावर पदोन्नतीवर बदली करण्यात आली आहे. 

सोलापूर शहराचे उपायुक्त विजय कुमार मगर यांची संजय बी. जाधव यांच्या ठिकाणी नांदेडला बदली करण्यात आली असून नागपूरचे पोलीस अधीक्षक राजा तिलक रोशन यांची उस्मानबाद पोलीस अधीक्षक पदी बदली झाली आहे.