सुधारित नागरिकत्व कायद्यावरून (सीएए) ईशान्य दिल्लीत सुरु असलेल्या हिंसाचाराविरोधात मुंबईतील मरिन ड्राइव्ह परिसरात आंदोलन करण्यात आले, या आंदोलकांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दिल्लीत सुरु असलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ गेट वे ऑफ इंडिया येथे आंदोलनकर्त्यांना सोमवारी रात्री उशीरा कँडल मार्च काढण्यास पोलिसांनी अटकाव केला . त्यानंतर गेट वे ऑफ इंडियाकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत. दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी पोलिसांच्या अटकावामुळे मरिन ड्राइव्ह गाठत कँडलसह ठिय्या दिले.
CAA : दिल्लीतील हिंसक आंदोलनात चौघांचा मृत्यू
सोमवारी मध्यरात्री उशीरा मुंबई पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. 'आझाद मैदान ही जागा निदर्शनांसाठी निश्चित करण्यात आलेली आहे. असं असताना देखील आंदोलनकर्ते निदर्शनासाठी गेट वे ऑफ इंडिया परिसरात आले तिथे येण्यापासून त्यांना रोखलं असता ते मरिन ड्राइव्ह परिसरात जमा झाले. यामुळे स्थानिकांची गैरसोय होत होती. नेमून दिलेल्या जागेशिवाय शहरात अन्यत्र कुठेही बेकायदेशीरपणे गर्दी केल्यास संबंधितांवर अटकेची कारवाई करण्यात येईल, असे मुंबई पोलिसांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
...म्हणून काँग्रेस नेत्यांनी दिला ट्रम्प यांच्यासोबतच्या डिनरला नकार
Mumbai: Police have detained the protesters who had gathered at Marine Drive to protest against yesterday's violence in Delhi. #Maharashtra https://t.co/Hru703lwJg pic.twitter.com/bUxtUoyLDr
— ANI (@ANI) February 24, 2020
दरम्यान दिल्लीतील जाफराबाद, मौजपूर भागात सुधारित नागरिकत्व कायद्याचे विरोधक आणि समर्थक सलग दुसऱ्या दिवशी आमने-सामने आले. त्यांनी एकमेकांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. सलग दुसऱ्या दिवशी उसळलेल्या हिंसाचाराच्या आगडोंबामुळे एका पोलिसासह इतर तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे.