पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ठाण्यात महिलेसमोर अश्लिल कृत्य करणाऱ्याला बेड्या

महिलेसमोर अश्लिल कृत्य करणाऱ्याला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे.

ठाण्यातील कोपरी परिसरात महिलेसमोर अश्लिल चाळे केल्याप्रकरणी एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीने २३ वर्षीय महिलेसमोर आश्लिल कृत केले. महिला पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये गेली असताना तिच्यासोबत हा धक्कादायक प्रकार घडला.

अज्ञाताने तिच्यासमोर अश्लिल कृत्य करण्यास सुरुवात केली. यावेळी डगमगून न जाता महिलेने या घटनेला कॅमेऱ्यात कैद केले. तिने संबंधित व्हिडिओच्या आधारावर पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल करुन संबंधिताला अटक केले. 

 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: police has arrested one person from Kopari area of Thane for molesting a 23 year old woman