पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नाना पाटेकरांना वाचवण्यासाठी पोलिसांनी तपासाकडे दुर्लक्ष केलं, तनुश्रींच्या वकिलांचा आरोप

तनुश्री नाना पाटेकर

नाना पाटेकरांना वाचवण्यासाठी पोलिसांनी तनुश्री दत्ता प्रकरणातील तपासाकडे दुर्लक्ष केलं असा आरोप तनुश्रीच्या वकिलांनी केला आहे. अभिनेत्री तनुश्री दत्तानं दाखल केलेल्या तक्रारीवरून नाना पाटेकर यांच्याविरोधात कोणतेही  पुरावे सापडले नाही असा चौकशी अहवाल ओशिवरा पोलिसांनी अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाला दिला आहे. मात्र पोलिसांच्या तपासावर तनुश्रीच्या वकिलांना नाराजी दर्शवली आहे. 

'मला चौकशी अहवालासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती ओशिवरा पोलिस स्टेशनकडून देण्यात आलेली नाही. पोलिसांनी चौकशी अहवाल सादर केला तरी तो अंतिम होत नाही. आम्ही पुन्हा पोलिसांना या प्रकरणाचा तपास करायला सांगू शकतो. पोलिसांनी या प्रकरणाकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला आहे त्यांना नाना पाटेकर यांना वाचवायचे होते', असा आरोप तनुश्रीचे  वकील नितिन सातपुते यांनी केला आहे. 

आदित्य ठाकरेसोबतच्या मैत्रीविषयी दिशा म्हणते....

'शायनी शेट्टी सोडली तर या प्रकरणात पोलिसांनी इतर प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवून घेतले नाही. पोलिसांनी योग्यप्रकारे या  प्रकरणाचा तपास केलेला  नाही आम्ही या  अहवालाचा विरोध करतो.' यासंदर्भात आम्ही याचिका दाखल करणार असल्याचेही नितीन सातपुते म्हणाले. 

२०१८ मध्ये अभिनेत्री तनुश्री दत्ता हिनं नाना पाटेकर यांच्यावर  गैरवर्तणुकीचे आरोप केले होते. 'हॉर्न ओके प्लीज' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान नानानं असभ्य वर्तन केलं तसेच  एका राजकीय पक्षाच्या गुंडांकरवी आपल्याला धमकावलं असा आरोप तनुश्रीनं केला होता. हे प्रकरण वर्षभरापासून चांगलच गाजतंय. ही घटना २००८ मधली होती. दहा वर्षांनतर तनुश्रीनं  एका मुलाखतीत मीटु मोहिमेबद्दल बोलताना ही घटना सांगितली होती. तेव्हापासून हे प्रकरण चर्चेत होतं. 

या खेपेला आपला दुखःद अंत होणार नाही, दीपिकाच्या पोस्टवर रणवीरची मजेशीर प्रतिक्रिया

तनुश्रीनं नाना पाटेकर यांच्याविरोधात ऑक्टोबर २०१८ मध्ये लेखी तक्रारही केली होती. तर नानाच्या वकिलांनी तनुश्रीला अब्रुनुकसानीची नोटीसही पाठवली होती. या प्रकरणाचा तपास पोलिस करत होते. मात्र तनुश्रीनं दाखल केलेल्या तक्रारीसंदर्भात नाना पाटेकर यांच्याविरोधात पुरावा न सापडल्याचा अहवाल पोलिसांनी न्यायालयाला दिला आहे.