पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कर्ज वसुलीसाठी विजय मल्ल्याची संपती विकणार; पीएमएलए कोर्टाची परवानगी

विजय मल्ल्या

भारतीय बँकांचे ९ हजार कोटीं घेऊन फरार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्याला कोर्टाने चांगलाच दणका दिला आहे. विजय मल्ल्याच्या संपत्तीचा लिलाव होणार आहे. याला मुंबईच्या पीएमएलए कोर्टाने परवानगी दिली आहे. पीएमएलए कोर्टाने स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आणि इतर बँकांना विजय मल्ल्याची संपत्ती जप्त करण्यास परवानगी दिली आहे. तसंच, ही जप्त केलेल्या संपत्तीचा लिलाव करुन कर्ज वसूल करण्यास कोर्टाने परवानगी दिली आहे.

मल्ल्याच्या वकिलांनी आक्षेप घेतला होता की, डेट रिकव्हरी ट्रिब्यूनलच याबाबतचा निर्णय घेऊ शकतो. मात्र आज सुनावणी दरम्यान पीएमएलए कोर्टाने मल्ल्याच्या संपत्तीचा लिलाव करुन कर्ज वसुली करण्यास परवानगी दिली आहे. दरम्यान, पीएमएलए कोर्टाने १८ जानेवारीपर्यंत या निर्णयावर स्थगिती आणली आहे, जेणेकरुन मल्ल्या या आदेशाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागू शकेल.

पदभार स्वीकारताच रावत म्हणाले, आम्ही राजकारणापासून दूरच

भारतातील बँकांचे ९ हजार कोटींचे कर्ज बुडवून विजय मल्ल्या मार्च २०१६ मध्ये लंडनला पळून गेला. त्याच्याविरुद्ध सक्तवसुली संचालनालयाने गुन्हा दाखल केला आहे. विजय मल्ल्याला भारताकडे प्रत्यार्पित करण्याचा खटला तेथील न्यायालयात सुरू आहे. त्याला भारतात आणण्यासाठी केंद्र सरकार आणि भारतीय तपास यंत्रणा प्रयत्न करत आहे. मात्र अद्याप यश आले नाही. 

सांगलीत नववर्षाच्या पाहटे गाड्यांची तोडफोड करत जाळल्या

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:PMLA Court in Mumbai allowed banks that lent money to vijay mallya to utilize seized assets