पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी माजी संचालकासह तिघांना अटक

पीएमसी बँक

पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या कथित घोटाळ्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आणखी तिघांना अटक केली आहे. याप्रकरणाचा तपास करणार्‍या मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी ही कारवाई केली. पीएमसी बँकेच्या माजी संचालकासह तीन जणांना अटक करण्यात आली. ४ हजार ३३५ कोटींचा हा घोटाळा असून याप्रकरणी आतापर्यंत १५ जणांना अटक करण्यात आली आहे. 

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडोंच्या पत्नीला कोरोनाची लागण

आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,  गुरुवारी जसविंदर सिंग बानवैत, विश्वनाथ श्रीधर प्रभू आणि श्रीपाद गोविंद जेरे यांना अटक करण्यात आली. अधिकाऱ्यांनी पुढे असे सांगितले की, एचडीआयएल समूहाशी जोडलेल्या ४ हजार ३३५  कोटींचा घोटाळा ज्यावेळी झाला होता तेव्हा  बानवैत हे बँकेचे संचालक होते. तसंच ते कर्ज, गुंतवणूक आणि कार्यकारी समितीचे सदस्य देखील होते.

कोरानाबाधितांचा आकडा थांबता थांबेना, राज्यात १४ जणांना लागण

पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी  चौकशीसाठी जसविंदर सिंग बानवैत, विश्वनाथ श्रीधर प्रभू आणि श्रीपाद गोविंद जेरे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. यांच्या चौकशी दरम्यान समाधानकारक उत्तरं न मिळाल्यामुळे पोलिसांनी तिघांना अटक केली. अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना १६ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

दिल्ली हिंसाचार: पीएफआयच्या अध्यक्ष आणि सचिवासह १२ जणांना अटक