पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पीएमसी बँक घोटाळा प्रकरण; बँकेच्या दोन संचालकांना अटक

पीएमसी बँक

पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. या घोटाळा प्रकरणी गुरुवारी आर्थिक गुन्हे शाखेने बँकेचे संचालक सारंग वाधवान आणि राकेश वाधवान या दोघांना अटक केली.

काँग्रेसला माझ्या सेवेची गरज नाही, संजय निरुपम यांची जाहीर नाराजी

पीएमसी बँकेला कर्जामध्ये डुबवणाऱ्या ४४ खात्यांपैकी १० खाते एचडीआयएल आणि वाधवान यांचे आहेत. या १० खात्यांमध्ये एक सारंग वाधवान आणि दुसरे राकेश वाधवान याचे वैयक्तीक खाते आहे. गुरुवारी पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी बोलावले होते. चौकशी दरम्यान दोघांनी समाधानकारक उत्तरे न दिल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे. 

एकनाथ खडसे माझ्या संपर्कात - शरद पवार

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आदेशावरुन सजबीरसिंग मठ्ठा यांनी या घोटाळा प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी बँकेचे संचालक जॉय थॉमस, चेअरमन वरियम सिंग, बँकेचे इतर पदाधिकारी आणि संचालक वाधवान यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार वाधवान यांची आज चौकशी झाली. 

सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोघांना अटक