पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पीएमसी बँक घोटाळा: एचडीआयएलच्या संचालकांचे खासगी जेट आणि कार जप्त

राकेश वाधवान आणि त्यांचा मुलगा सारंग वाधवान

पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या बँकेचे संचालक राकेश वाधवान आणि त्यांचा मुलगा सारंग वाधवान यांच्याविरोधात ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीने शनिवारी दावा केला आहे की, त्यांनी राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांचे खासगी जेट, कार आणि ६० कोटींचे दागिने जप्त केले आहेत. तसंच ईडीने असे देखील सांगितले की, बोटिंग व्यवसायात वापरल्या जाणार्‍या वाधवान यांच्या बोटी देखील जप्त केल्या जाणार आहेत. त्यासाठी ते मालदीवच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत.

पुण्यातील पर्वती येथे गाड्यांना आग; ७ गाड्या जळून खाक

ईडीने पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष वरयाम सिंग यांची बँक खाती गोठवली. तसेच सुमारे १० कोटी रुपयांच्या ठेवी जप्त केल्या आहेत. ईडीने एचडीआयएलच्या प्रवर्तकांविरूद्ध पीएमसी बँकेच्या ४ हजार ३५५ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आर्थिक तपास यंत्रणा एचडीआयएलशी संबंधित १८ अन्य कंपनीच्या तपशिलाचीही चौकशी करत आहेत.

दिल्लीला हादरवण्यासाठी जैशने 'या' संघटनांशी केली हात मिळवणी

ईडीने वांद्रे (पूर्व) येथील एचडीआयएलचे मुख्य कार्यालय आणि वांद्रे (पश्चिम) येथील राकेश वाधवान यांच्या निवास स्थानासह मुंबईतील सहा ठिकाणी छापे टाकले. वरयाम सिंह आणि पीएमसी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांच्या बंगल्यांवरही ईडीने छापे टाकले. ईडीने सांगितले की, राकेश वाधवान आणि त्यांचा मुलगा सारंग वाधवान यांच्यासह एचडीआयएलच्या सात संचालकांवर ईडीचे लक्ष आहे. राकेश आणि सारंग वाधवान यांना गुरुवारी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. 

आरेतील वृक्षतोड रोखण्यासाठी शिवसेना सुप्रीम कोर्टात जाणार