पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पीएमसी बँकेच्या खातेधारकांचे आझाद मैदानावर आंदोलन

पीएमसी बँक खातेधारकांचे आंदोलन

पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणी ठेवीदार आणि खातेधारकांचे आझाद मैदान येथे आंदोलन सुरु आहेत. सकाळी १०. ३० वाजता या आंदोलनाला सुरुवात झाली असून ३ वाजेपर्यंत हे आंदोलन चालणार आहे. या आंदोलनामध्ये मुंबईसह नवी मुंबईतील पीएमसी बँकेचे २०० पेक्षा अधिक ठेवीदार आणि खातेधारक सहभागी झाले आहेत. आंदोलनानंतर पोलिसांनी काही खातेधारकांना ताब्यात घेतले आहे.

... म्हणून प्रियांका गांधींनी महाराष्ट्रात प्रचार केला नाही

पीएमसी बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घातलेल्या निर्बंधामुळे खातेधारकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आयुष्यभराची कमाई बँकेत अडकल्यामुळे खातेधारक चिंतेत आले आहे. त्यामुळे ते बँकेविरोधात आंदोलन करत आहेत. पैसे अडकलेल्या काही खातेधारकांचा चिंतेत येऊन मृत्यू झाला आहे. आतापर्यत ६ खातेधाकांचा मृत्यू झाला असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे. 

इक्बाल मिर्चीचा सहकारी हुमायूं मर्चंटला ईडीने केली अटक

आतापर्यंत पीएमसी बँकेविरोधात जे आंदोलन झाले होते ते आरबीआय, किल्ला कोर्ट तसंच पीएमसी बँकेसमोर करण्यात आले होते. मात्र आता संतप्त झालेल्या खातेधारकांनी थेट आझाद मैदानावर आंदोलन केले आहे. पीएमसी बँकेत अडकलेले पैसे परत मिळावे, आरबीआयने पीएमसी बँकेवर लादलेले निर्बंध मागे घ्यावेत अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली आहे. 

कुठलेही बटण दाबा, मत कमळालाच; साताऱ्यात प्रकार घडल्याचे माध्यमांचे वृत