पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पीएमसी बँक घोटाळाः भाजप नेत्याच्या मुलाला अखेर अटक

संशयित आरोपी रणजित सिंग

सुमारे ४,३५५ कोटी रुपयांच्या पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी आणखी एका मोठा मासा गळाला लागला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार सरदार तारासिंग यांचा मुलगा आणि या घोटाळ्यातील संशयित राजनीत सिंग याला मुंबई पोलिसांच्या आर्थिक शाखेने शनिवारी अटक केली. 

राजनीत सिंगच्या अटकेमुळे अनेक गोष्टी समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राजनीत सिंग हे बँकेच्या कर्जवसुली समितीवर होते. 

दरम्यान, आता पीएमसी बँकेतून खातेदारांना ५० हजार रुपये काढता येणार आहेत. आर्थिक गैरव्यवहारांमुळे रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेतील व्यवहारांवर निर्बंध घातले. पण या निर्बंधांनंतर अनेक खातेदारांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यापार्श्वभूमीवर टप्याटप्याने रिझर्व्ह बँकेने बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा वाढवत नेली आहे.

तत्पूर्वी, एचडीआयएल ग्रुपचे राकेश व सारंग वाधवान, बँकेचे माजी चेअरमन वरयाम सिंग, माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांचा समावेश आहे. पीएमसी बँकेतील ४ हजार ३५५ कोटींचा कर्ज घोटाळा उघड झाल्यानंतर या सर्वांना अटक करण्यात आली आहे.

देशातील पहिल्या दहा सहकारी बँकांमध्ये समावेश असणाऱ्या पंजाब आणि महाराष्ट्र बँकेत झालेल्या प्रचंड घोटाळ्यामुळे रिझर्व्ह बँकेने त्यांच्यावर निर्बंध लादले आहेत. बँकेच्या व्यवस्थापनाने एनपीए आणि कर्जवितरणासंबंधी चुकीची माहिती रिझर्व्ह बँकेस सादर केली होती. यानंतर घोटाळा उघडकीस आला होता. मात्र, यामुळे बँकेतील ठेवीदार मोठे अडचणीत आले आहेत.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:PMC Bank matter Rajneet Singh former Director of PMC Bank and son of former BJP MLA Tara Singh arrested