पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

PMC बँक घोटाळा: माजी संचालक सुरिंदर अरोरा यांना अटक

पीएमसी बँक

पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणात या बँकेचे माजी संचालक सुरिंदर अरोरा यांना बुधवारी अटक करण्यात आली. मुंबईतील आर्थिक गुन्हे विभागाने ही कारवाई केली. बँक घोटाळ्यासंदर्भात त्यांची कसून चौकशी देखील करण्यात आली. पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) घोटाळ्याच्या वृत्तानंतर या बँकेतील खातेधारकांवर अक्षरश: संकट ओढावले.

पृथ्वीराजबाबांना त्यांच्या घरचीही मतं मिळणार नाहीतः उदयनराजे

आयुष्यभराची कमाई या बँकेत अडकून असल्याने आतापर्यंत तीन खातेधारकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यातील संजय गुलाटी आणि फत्तोमल पंजाबी यांनी ह्रदयविकारामुळे जीव गमावला असून वरसोवा येथील एका डॉक्टराने आत्महत्या करुन आयुष्य संपल्याचे समोर आले होते. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आत्महत्येचा बँक घोटाळ्याशी काही संबंध नाही, असा अंदाज आहे. 

'पाच वर्षांत नरेंद्र-देवेंद्र फॉर्म्युला सुपर हिट'

पीएमसी बँक घोटाळा समोर आल्यापासून खातेधारकांना आपल्या खात्यातून पैस काढण्याचे निर्बंध घालण्यात आले आहेत. खातेधारकांनी आपल्या पैशासाठी दिल्लीच्या न्यायालयाबाहेर निदर्शने देखील करत आहेत. सध्याच्या घडीला पीएमसी बँकचा कारभार हा रिझर्व्ह बँकेच्या प्रशासना अंतर्गत सुरु आहे. पीएमसी बँकेत ११ हजार ६०० कोटी रुपये जमा असलेली देशातील १० प्रमुख सहकारी बँकापैकी एक आहे.