पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पीएमसी बँकेत ९० लाख अडकले; खातेधारकाचा हार्ट अटॅकने मृत्यू

संजय गुलाटी

पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेने घातलेल्या नर्बंधामुळे खातेधारकांना अनेक अडचणींचा सामाना करावा लागत आहे. याच दरम्यान पीएमसीच्या एका खातेधारकाचा मृत्यू झाला आहे. पीएमसी बँकेविरोधात आंदोलन करणाऱ्या खातेधारकाचा मृत्यू झाला आहे. या खातेधारकाचे पीएमसी बँकेच्या खात्यावर ९० लाख रुपये जमा आहेत.

भाजपचा 'दुष्काळमुक्त महाराष्ट्र'चा संकल्प

पीएमसी बँकेवर लादलेल्या निर्बंधाविरोधात सोमवारी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये ओशिवरातील तारापोरेवाला गार्डनजवळ राहणारे संजय गुलाटी हे सहभागी झाले होते. आंदोलन संपल्यानंतर रात्री ते घरी गेले. त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 

महाराष्ट्राच्या प्रांजल पाटील पहिल्या दृष्टिहीन महिला आयएएस

संजय गुलाटी हे जेट एअरवेजमध्ये इंजिनिअर होते. काही दिवसांपूर्वी जेट एअरवेज बंद पडल्यामुळे ते आर्थिक अडचणीत आले होते. पीएमसी बँकेमध्ये त्यांचे खाते असून त्यामध्ये ९० लाख रुपये होते. मात्र बँकेवर घालण्यात आलेल्या निर्बंधामुळे ते चिंतेत आले होते. अशातच त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्यांचे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

नालासोपारा पोलिस ठाण्यात गळा चिरून आरोपीची हत्या

दरम्यान, आरबीआयने घातलेल्या निर्बंधामुळे खातेधारकांना त्यांच्या खात्यातील रक्कम काठणे कठीण झाले आहे. त्यामुळे आरबीआयने पीएमसी बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा वाढवून ४० हजार रुपये केली आहे.  ग्राहकांना आता सहा महिन्याच्या कालावधीत ४० हजार रुपये काढता येणार आहे. आतापर्यंत ही मर्यादा फक्त २५ हजार रुपये होती. 

पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी ३ हजार ८३० कोटींची मालमत्ता जप्त