पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आलेल्या माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस आणि माजी संचालक सुरजीत सिंह अरोरा यांना गुरुवारी कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने जॉय थॉमस यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तर सुरजीत सिंह अरोरा यांना २२ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने बुधवारी रात्री सुरजीत सिंह अरोरा यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली.
Punjab & Maharashtra Co-operative (PMC) Bank case: Former PMC Bank Director S Surjit Singh Arora sent to police custody till 22nd October by Mumbai's Esplanade court. https://t.co/zmiqPZfCID
— ANI (@ANI) October 17, 2019
भाजप यंत्रणांना हाताशी धरुन विरोधकांना धमकावतेय- अशोक चव्हाण
४ हजार ३५५ कोटींचा पीएमसी बँक घोटाळा आहे. या घोटाळा प्रकरणामुळे आरबीआयने बँकेवर निर्बंध लादले आहे. त्यामुळे बँकेच्या खातेधारकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या प्रकरणी यापूर्वी एचडीआयएलचे प्रवर्तक राकेश वाधवान, त्यांचा मुलगा सारंग वाधवान आणि पीएमसी बँकेचे अध्यक्ष वरयाम सिंग यांच्याविरोधात कारवाई करत ईडीने अटक केली होती. हे तिघेही सध्या पोलिस कोठडीमध्ये आहेत.
महात्मा गांधींच्या हत्येच्या कटात सावरकरांचा सहभाग
पीएमसी बँक घोटाळा प्रकरणाने आतापर्यंत तीन जणांचा बळी घेतला आहे. आयुष्यभराची कमाई या बँकेत अडकून असल्याने चिंतेत आलेल्या संजय गुलाटी आणि फत्तोमल पंजाबी यांचा ह्रदयविकाराने मृत्यू झाला. तर वरसोवा येथे राहणाऱ्या डॉ. निवेदिता बिजलानी यांनी आत्महत्या केली. या घटनेमुळे पीएमसी बँक घोटाळा प्रकरणाला वेगळे वळण आले आहे.
'बाबरी मशिद प्रकरणात सुप्रीम कोर्टाच्या निकालाला आव्हान देणार