पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी ३ हजार ८३० कोटींची मालमत्ता जप्त

पीएमसी बँक खातेधारकांना दिलासा

1 / 2पीएमसी बँक खातेधारकांना दिलासा

पीएमसी बँक

2 / 2पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेच्या खातेदारांना फक्त १ हजार रुपये ऐवढीच रक्कम काढता येणार आहे. (photo by Praful Gangurde, Satyabrata Tripath/ Hindustan Times)

PreviousNext

पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीने या घोटाळा प्रकरणी आतापर्यंत ३ हजार ८३० कोटींपेक्षा अधिक मालमत्ता जप्त केली आहे.  यामध्ये स्थावर आणि जंगम मालमत्ता यांचा समावेश आहे, अशी माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

 

भीमा-कोरेगाव प्रकरण: तिन्ही विचारवंताच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

या घोटाळा प्रकरणी एचडीआयएलचे प्रवर्तक राकेश वाधवान, त्यांचा मुलगा सारंग वाधवान आणि पीएमसी बँकेचे अध्यक्ष वरयाम सिंग यांच्याविरोधात ईडीने कारवाई केली आहे. जप्त केलेल्या मालमत्तेत दोन विमाने, महागड्या गाड्या, क्रुझ, दागिने यांचा समावेश आहे. मनी लाँड्रिंग प्रतिबंध कायद्याअंतर्गत ही जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. 

BLOG : राम शिंदे की रोहित पवार, कर्जत-जामखेडकरांच्या मनात

पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या या तिघांच्या पोलिस कोठडीत १६ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, आरबीआयने पीएमसी बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा वाढवून ४० हजार रुपये केली आहे. त्यामुळे ग्राहक सहा महिन्याच्या कालावधीत ४० हजार रुपये काढू शकणार आहे. आतापर्यंत ही मर्यादा २५ हजार रुपये होती. 

आपलंच हेलिकॉप्टर पाडलं: ६ अधिकाऱ्यांवर हवाईदलाची कारवाई