पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पीएमसी बँक घोटाळ्याचा तिसरा बळी; महिला डॉक्टरने केली आत्महत्या

पीएमसी बँक

पंजाब महाराष्ट्र बँक घोटाळा प्रकरणामुळे चिंतेत येऊन दोन खातेधारकांनी आत्महत्या केल्यीच घटना ताजी असताना मुंबईत एका महिला डॉक्टरने आत्महत्या केली आहे. वर्सोवा येथे राहणाऱ्या डॉ. निवेदिता बिजलानी यांनी आत्महत्येचा पाऊल उचलले. त्यांचे पीएमसी बँकेत खाते होते. बँकेत अडकलेले पैसे कसे काढायचे या चिंतेतून त्यांनी आत्महत्या केली असल्याचे सांगितले जात आहे. 

खासदार ओमराजे निंबाळकरांवर चाकू हल्ला; हल्लेखोराला अटक

३९ वर्षाच्या डॉक्टर निवेदिता बिजलानी या वर्सोवा मॉडेल टाऊन परिसरात राहत होत्या. बँकेत अडकलेल्या पैशांच्या चिंतेतून त्यांनी आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले. त्यांनी सोमवारी रात्री अति प्रमाणात झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या केली. त्यांचे पीएमसी बँकेतील खात्यात १ कोटी रुपये अडकले होते. 

'कलम ३७०चा महाराष्ट्राशी काय संबंध विचारणाऱ्यांना लाज

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निवेदिता बिजलानी यांनी नुकताच पुनर्विवाह केला होता. त्या सतत नैराश्याने ग्रासलेल्या होत्या. अमेरिकेत असतानाही त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, पोलिसांना निवेदिता यांच्या घरातून सुसाईड नोट सापडली नाही. याप्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

INX मीडिया प्रकरणी चिदंबरम यांना ED कडून अटक 

पीएमसी बँक घोटाळा प्रकरणाच्या चिंतेतून आधीच दोन खातेधारकांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. मुलुंड येथे राहणारे  फट्टोमल पंजाबी (५९ वर्ष) आणि ओशिवरा येथे राहणाऱ्या संजय गुलाटी यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. आता पीएमसी बँक घोटाळ्यामुळे तिसरा बळी देखील गेल्यामुळे या प्रकरणाला नवे वळण आले आहे. 

पीएमसी बँक घोटाळा: आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत