पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पीएमसी बँक घोटाळा: राकेश वाधवानसह तिघांची रवानगी पोलिस कोठडीत

पीेएमसी बँक घोटाळा

पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणावर सोमवारी मुंबईतील एका न्यायालयामध्ये सुनावणी झाली. न्यायालयाने याप्रकरणात अटकेत असलेल्या बँकेचे संचालक राकेश वाधवान, त्यांचा मुलगा सारंग वाधवान आणि बँकेचे अध्यक्ष वरयाम सिंग यांची रवानगी पोलिस कोठडीत केली आहे. न्यायालयाने त्यांना १६ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पक्षाने काहीही निर्णय घेऊ द्या, मी काँग्रेस सोडणार नाहीः संजय निरुपम

पीएमसी बँकेच्या कामकाजात अनियमितता आणि रिअल इस्टेट कंपनी एचडीआयएलला देण्यात आलेल्या कर्जाची योग्य माहिती न दिल्यामुळे त्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. पीएमसी बँकेतील ४ हजार ३५५ कोटी रुपयांच्या घोटाळ्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी या तिघांना अटक केली होती. पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी बँकेचे माजी सरव्यवस्थापक जॉय थॉमस यांना अटक केली होती.

वणीमधील सभेत राज ठाकरे यांची पृथ्वीराज चव्हाणांवर घणाघाती

पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी राकेश वाधवान आणि त्यांचा मुलगा सारंग वाधवान यांच्याविरोधात ईडीने कारवाई केली होती. राकेश आणि सारंग वाधवान यांचे खासगी जेट, कार आणि ६० कोटींचे दागिने ईडीने जप्त केले होते. तसंच ईडीने त्यांच्या बोटिंग व्यवसायात वापरल्या जाणार्‍या बोटी देखील जप्त केल्या जाणार असल्याचे सांगितले होते.

PMCच्या जॉय थॉमसांचे कारनामे, नाव बदलून पुण्यात १० मालमत्तांची

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:pmc bank case accused rakesh wadhawan sarang wadhawan waryam singh sent to police custody