पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पीएमसी बँक घोटाळा: आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत

पीएमसी बँक

पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणावर बुधवारी मुंबईतील न्यायालयामध्ये सुनावणी झाली. याप्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.  एचडीआयएलचे संचालक राकेश वाधवान, त्यांचा मुलगा सारंग वाधवान आणि बँकेचे अध्यक्ष वरयाम सिंग यांना २३ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 

'कलम ३७०चा महाराष्ट्राशी काय संबंध विचारणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे'

पीएमसी बँक घोटाळा प्रकरणातील आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत केल्यामुळे त्यांचा जामीनासाठी अर्ज करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तिन्ही आरोपींना ७ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहेत. त्यामुळे यापुढची सुनावणी आता २३ ऑक्टोबर रोजी होणार आहे. ४ हजार ३५५ कोटी रुपयांच्या या घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांनी या तिघांना अटक केली होती.

मूळ मुद्द्यांपासून लक्ष हटविण्यासाठी भाजपकडून कलम

दरम्यान,  पीएमसी बँक घोटाळ्यामुळे चिंतेत आलेल्या दोन खातेधारकांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. सोमवारी पीएमसी बँकेविरोधात आंदोलन करुन घरी गेलेल्या संजय गुलाटी यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. तर त्यानंतर मंगळवारी दुपारी फट्टोमल पंजाबी (५९ वर्ष) या खातेधारकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. ते मुंबईतील मुलुंड परिसरात रहात होते. या घटनांमुळे पीएमसी बँक घोटाळा प्रकरणाला वेगळे वळण आले आहे. 

हेमामालिनीच्या गालासारखे गुळगुळीत रस्ते करू, मंत्री बरळले

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:pmc bank case accused rakesh wadhawan sarang wadhawan and waryam singh sent to judicial custody