पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

२४ तासात पीएमसी बँकेच्या आणखी एका खातेधारकाचा मृत्यू

पीएमसी बँक खातेधारकाचा मृत्यू

पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्यामुळे चिंतेत आलेल्या आणखी एका खातेधारकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे याप्रकरणाला नवे वळण आले आहे. फट्टोमल पंजाबी (५९ वर्ष) या खातेधारकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. ते मुंबईतील मुलुंड परिसरात रहात होते.

पीएमसी बँकेत ९० लाख अडकले; खातेधारकाचा हार्ट अटॅकने मृत्यू

फट्टोमल पंजाबी यांच्या मृत्यूची माहिती त्यांचे भाऊ दीपक पंजाबी यांनी दिली आहे. असे सांगितले जात आहे की, हार्डवेअर आणि इलेक्ट्रिकल स्टोर चालवणाऱ्या फट्टोमल पंजाबी यांचे पीएमसी बँकेत खाते होते. या खात्यावर त्यांनी आयुष्यभराची कमाई जमा करुन ठेवली होती. मात्र पीएमसी बँकेवर रिझर्व्ह बँकेने टाकलेल्या निर्बंधामुळे त्यांना पैसे काढता येत नव्हते. त्यामुळे ते चिंतेत होते. मंगळवारी दुपारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

त्यांचा कारभार वांझोटा तर यांचा खोटेपणाचा; 'राज' की बात 

दरम्यान, पीएमसी बँक घोटाळ्यामुळे २४ तासात दोन खातेधारकांचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. याआधी ओशिवरा येथील तारापोरेवाला गार्डनजवळ राहणारे संजय गुलाटी या खातेधारकाचा मृत्यू झाला होता. पीएमसी बँकेच्याविरोधात आंदोलन करुन घरी आल्यानंतर त्यांना देखील हृदयविकाराचा झटका आला. त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांचे पीएमसी बँकेत खाते असून त्यात ९० लाख रुपये अडकले होते. 

सप्टेंबरमध्ये निर्यातीत ६.५७ टक्क्यांची घसरण