पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रत्येक भारतीयाने देशहितासाठी संकल्प करावा, पंतप्रधान मोदींचा नवा मंत्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी  (HT- Kunal Patil)

मुंबईत २० हजार कोटींहून अधिक कामांना प्रारंभ होत आहे. या योजनेमुळे मुंबईच्या पायाभूत विकासाला नवा आयाम मिळेल. या सरकारने पायाभूत विकासाला प्राधान्य दिले आहे. मुंबईच्या गतीने देशालाही गती दिल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत मेट्रो मार्गिकेच्या आणि विविध विकासकामांच्या पायाभरणी प्रसंगी केले. मुंबईत हळूहळू बदल होण्यास सुरुवात झाली आहे. जेवढे प्रवासी आज मुंबईच्या लोकलमधून प्रवास करत आहेत. तितकेच लोक भविष्यात मेट्रोमधून प्रवास करतील, असेही त्यांनी म्हटले. त्याचबरोबर प्रत्येक भारतीयाने एक संकल्प करावा. हा संकल्प देशहितासाठी करावा, असा 'एक भारतीय एक संकल्प' हा नवा मंत्रही त्यांनी यावेळी दिला. 

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, सुराज्य हे आपल्या देशवासियांचे कर्तव्य आहे. प्रत्येकाने एक निश्चित करावा. जो संकल्प कराल तो देशहितासाठी करा. संकल्प पूर्ण करण्यासाठी कधीच मागे राहू नका. तुम्हाला मुंबई-महाराष्ट्रासाठी संकल्प करायचा असेल तर तोही करा. 

पंतप्रधान मोदी यांनी प्लास्टिकमुक्त देश करण्याचे आवाहन केले. मुंबईकरांनी यंदा प्लास्टिकमुक्त गणेश विसर्जन करावे. प्लास्टिक आपल्या समुद्रात जाते. त्यामुळे जलप्रदुषण वाढते. प्रदुषण करणाऱ्या वस्तू पाण्यात टाकायच्या नाहीत, हे ठरवा. प्लास्टिकमुक्त मिठी नदी, प्लास्टिकमुक्त समुद्र करण्याचा संकल्प करा, असेही ते म्हणाले. 

इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या हिंमतीने प्रभावितः पंतप्रधान मोदी
मुंबईच्या स्पिरीटबाबत मी खूप ऐकलंय पण आज इस्रोच्या शास्त्रज्ञांचं स्पिरीट पाहिलं आहे. इस्रो म्हणजे ज्ञानाचं भांडार आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी दाखवलेल्या हिंमतीने प्रभावित झालो आहे, असे म्हणत चंद्रावर जाण्याचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.

'वन नेशन-वन टॅक्स-वन नेटवर्क'वर काम सुरु 
पायाभूत विकासावर सरकार १०० लाख कोटी खर्च करणार आहे. आपल्या देशात ३०-३५ वर्षांपूर्वी पहिली मेट्रो सुरु झाली होती. आज देशात २७ ठिकाणी मेट्रो सुरु झाली आहे किंवा भविष्यात सुरु होणार आहे. देशात ६७५ किमी मेट्रो कार्यरत आहे. ८५० हून अधिक अंतरावर मेट्रोचे काम सुरु आहेत. गेल्या ५ वर्षांत ४०० किमी अंतराच्या मेट्रोचे कामकाज सुरु आहे. मुंबईत सध्या ११ किमी मेट्रोचे जाळे आहे. 'एक भारत श्रेष्ठ भारत' अंतर्गत विकासकामे सुरु आहेत. 'वन नेशन-वन टॅक्स-वन नेटवर्क'वर काम सुरु आहे, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:pm narendra modi in mumbai lay foundation stone three metro corridor gives new sanklap for every indians