पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'मोदींची शिवरायांसोबत तुलना मान्य आहे का? वंशजांनो काहीतरी बोला!'

संजय राऊत यांनी शिवाजी महाराजांच्या वंशजांसमोर प्रश्न उपस्थित केला आहे.

एका पुस्तकाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केल्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी या मुद्यावरुन भाजपवर निशाणा साधल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी थेट छत्रपतींच्या वंशजांना ही तुलना मान्य आहे का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. संजय राऊत यांनी ट्विटच्या माध्यमातून 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकावर आक्षेप नोंदवलाय. सातारा गादीचे वारसदार श्रीमंत उदयनराजे,  श्रीमंत शिवेंद्रराजे कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे यांना हे मान्य आहे का? शिवरायांच्या वंशजांनो काहीतरी बोला, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. 

BJP नेत्याकडून मोदींची छत्रपती शिवरायांंशी तुलना, आव्हाड संतापले

संजय राऊत यांनी ट्विटमध्ये लिहलंय की,  या पुस्तकाचे लेखक जय भगवान गोयल अगोदर शिवसेनेत होता. महाराष्ट्र सदनावर हल्ला केल्यानंतर शिवसेनेने त्याची पक्षातून हकालपट्टी केली. शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करत त्यांची महाराजांसोबत केलेली तुलना भाजपात शिरलेल्या छत्रपतींच्या वंशजांना मान्य आहे का? लेखक महाशयांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनावर हल्ला करुन शिवरायांच्या महाराष्ट्राचा आणि माणसाला शिव्या घातल्या होत्या, असा उल्लेखही संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये केलाय. 

देशविरोधी घोषणा देणाऱ्यांना जेलमध्ये डांबायला हवे की नको?: अमित शहा

छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेले उदयनराजे भोसले यांनी राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे घड्याळ काढून खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी  भाजपचे कमळ हाती घेतले होते. राज्यातील विधानसभा निवडणुकीवेळीच सातारा मतदारसंघातील खासदारकीची निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर उभे राहिलेल्या उदयनराजे यांना राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी पराभवाचा धक्का दिला होता. साताऱ्यातील या घडामोडीनंतर उदयनराजे फारसे चर्चेत दिसलेले नाहीत. शिवेंद्रराजे यांनी देखील विधानसभा निवडकीपूर्वी राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केला होता. ते विधानसभा निवडणुकीत निवडून देखील आले आहेत. याशिवाय कोल्हापूर गादीचे वारसदार छत्रपती संभाजीराजे भोसले हे देखील राष्ट्रपतीनियुक्त खासदर आहेत.  भाजपच्या कार्यालयात प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तकातून मोदींची छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत तुलना केल्यानंतर ही मंडळी काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: pm narendra modi compare with chhatrapati shivaji maharaj bjp releases book controversy Sanjay Raut Quesstioned to udayanraje bhosale shivendra raje and Sambhaji raje Bhosle