पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'...कारण मी कोणाच्या बापाला घाबरत नाही'

संजय राऊत (ANI)

'मला आधीपासून माहिती होते की फोन टॅपिंग होत होता. पण मी बाळासाहेबांचा शिष्य आहे. घाबरुन काम करत नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. फोन टॅप प्रकरणावर माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांचे फोन टॅप झाल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे.

Maharashtra Bandh Live: औरंगाबाद, सोलापूरमध्ये बसवर दगडफेक 

जागा वाटपाची घोषणा झाल्यापासून आणि निवडणूक काळापासून फोन टॅपिंगच्या घटना सुरु झाल्या होत्या, असे संजय राऊत यांनी सांगितले आहे. फोन टॅपिंग होत होते हे मला माहिती होते. तरी सुध्दा मी माझा नंबर बदलला नाही. कारण मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. गृहमंत्रालयाला फोन टॅपिंग करण्याची आणि त्यांच्या विरोधकांवर लक्ष ठेवण्याची सवय आहे. विरोधकांवर पाळत हे राजकारण नाही. हा रडीचा डाव, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. दरम्यान, ते फोन टॅपिंगमध्ये व्यग्र होते आणि आम्ही महाराष्ट्रात सरकारची स्थापना केली, असे संजय राऊत यांनी सांगितले.

मुंबईमध्ये बंदला हिंसक वळण; चेंबूरमध्ये बसवर दगडफेक

दरम्यान, संजय राऊत यांनी शुक्रवारी सकाळी एक ट्विट करत असे म्हटले होते की, 'तुमचा फोन टॅप होत आहे, ही माहिती मला भाजपाच्या एका ज्येष्ठ मंत्र्यानं दिली होती. जर माझं बोलणं कोणाला ऐकायचं असेल तर त्यांचे स्वागतच आहे. मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिष्य आहे. मी कोणत्याही गोष्टी लपून करत नाही. ऐका माझं बोलणं.' असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारनं फोन टॅपिंग प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

भीमा-कोरेगाव : ते पत्र नेमके आले कुठून, सरकारची पोलिसांकडे