पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईकरांना घरीही मिळेल कोरोना टेस्टची सेवा

कोरोना तपासणी

कोरोना विषाणूचे वेगाने होणारे संक्रमण रोखण्यासाठी सरकार आणि प्रशासनाकडून सर्व प्रयत्न सुरु आहेत. मुंबई महानगर पालिका कोरोना व्हायरसच्या तपासणीसाठी पुढील दोन दिवसांत हेल्पलाईन नंबर सुरु करणार आहे. या सुविधेमध्ये कोरोनाची लक्षणं आढळणाऱ्या संशयिताच्या तपासणीचे नमुने घरी जाऊन घेतले जातील.  

शिवराज सिंह चौथ्यांदा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री

हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करुन कोरोनाच्या चाचणीसंदर्भात बुकींग केल्यानंतर खासगी लॅबचा प्रतिनिधी घरी येऊन नमुने घेऊन जाईल, अशी सेवा पुरवण्यात येणार आहे. हेल्पलाईनसह घरातून कोरोनाची टेस्ट करण्याची सुविधा पुढील ४८ तासांत सुरु होईल, अशी माहिती पालिका प्रशासनाने परिपत्रकाच्या माध्यमातून दिली आहे. सध्याच्या घडीला इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) च्या नोंदणीकृत खासगी लॅबमध्ये टेस्टला परवानगी देण्यात आली आहे. 

बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या तपासणीसाठी मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी टाळण्याच्या उद्देशाने हा घरातून चाचणीसाठी नमुने घेऊन सेवा पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला.  इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या अधिसूचनेनुसारच याची अंमलबजावणी करण्यात येईल.  

आता फोनवरुन डॉक्टरांचा सल्ला घेता येणार, पण..

कोरोना विरोधातील लढ्याविरोधात दोन हात करण्यासाठी महाराष्ट्रात संचारबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हेल्पलाईन क्रमांक सुरु झाल्यानंतर रुग्णांची वर्गवारी करुन आवश्यकतेनुसार खासगी लॅब वाल्यांना घरी पाठवून कोरोना चाचणीचे नमुने घेणे देखील शक्य होईल.